वाजेकर विद्यालयास 70 पुस्तके भेट

| पनवेल | वार्ताहर |

आदर्श शिक्षक गजानन खारपाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांचे कनिष्ठ पुत्र, महामुंबई चॅनेल चे संपादक, जेष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी (दि.8) रोजी रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर विद्यालयास 70 पुस्तके भेट दिली.

आतापर्यंत त्यांनी सेकंडरी स्कूल चिरनेर के गो लिमये वाचनालय पनवेल न्यू इंग्लिश स्कूल पनवेल वासुदेव बळवन्त फडके हायस्कूल पनवेल साने गुरुजी वाचनालय नेरे शांतीवन रयत शिक्षण संस्थेचे वावरले हायस्कूल तालुका वाचनालय पोलादपूर गजानन महाराज वाचनालय गिम्हवणे दापोली साने गुरुजी वाचनालय भापट, म्हसळा सार्वजनिक माध्यमिक विद्यालय रावे. पेण मातोश्री विद्यामंदिर देवनार, मुंबई केशवराव खांबेटे वाचनालय, म्हसळा लोकमान्य टिळक वाचनालय, चौक तु ह वाजेकर, विद्यालय फुंडे या आणि इतरही काही वाचनालयाना आत्तापर्यंत 5 लाख रुपये किंमतीची पुस्तके भेट दिली आहेत. रायगड जिल्हा परिषदेनेआदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित गजानन खारपाटील गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल हा संदेश दिला होता. यावेळी फुंडे हायस्कूलचे प्राचार्य एम. जी. म्हात्रे सर, ज्युनिअर कॉलेज प्रमुख व्ही. के. कुटे सर, शिक्षिका दर्शना माळी आदी उपस्थित होते.

Exit mobile version