सागवेकर फाऊंडेशनने दिला जगण्याचा आधार
| म्हसळा | वार्ताहर |
रविप्रभा मित्र संस्था यांच्या विशेष प्रयत्नाने व कै. सुहासिनी परब व कै. कल्पेश परब यांच्या स्मरणार्थ सागवेकर फाऊंडेशन यांच्या माध्यमातून म्हसळा तालुक्यातील दुर्गवाडी येथील राजेंद्र बांद्रे यांच्या 24 वर्षीय गणेश बांद्रे या दिव्यांग व गतिमंद मुलाला मोफत व्हीलचेअर देऊन जीवन जगण्याचा अधिकार देण्याचा हक्क दिला. या मुलाच्या पालकांनी श्री रविप्रभा मित्र संस्था व सागवेकर फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.
यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी दामोदर दिघीकर यांनी संस्थेचे आभार मानत या दोन्ही संस्थेचे कार्य खूप मोठे आहे, या मुलाला व्हीलचेअरची गरज असताना श्री रविप्रभा मित्र संस्था यांच्या विषेश प्रयत्नाने व कै. सुहासिनी परब व कै. कल्पेश परब यांच्या स्परणार्थ सागवेकर फाऊंडेशनतर्फे या दिव्यांग तरुणाला एक हात मदतीचा देऊन पुण्याचे काम केल्याचे ते म्हणाले.
व्हीलचेअर मुंबईमधून म्हसळा येथे आणण्याचे महत्त्वाचे काम संस्थेचे सभासद जितेंद्र रिकामे यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी दामोदर दिघीकर, ओ.एस. हेमंत माळी, ग्रामसेवक योगेश पाटील, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड, उपाध्यक्ष नरेश विचारे, सचिव संतोष उध्दरकर, सहसचिव स्वनील लाड, खजिनदार सुशांत लाड, सदस्य दत्तात्रेय लटके, शंकर कासार, किशोर घुलघुले, संतोष घडशी, समीर लांजेकर, समाजसेवक कौस्तुभ करडे, गाव अध्यक्ष धोंडु बांद्रे, पालक राजेश बांद्रे, रोहिणी बांद्रे, महिला अध्यक्षा शारदा बांद्रे, अंगणवाडी सेविका अमिता कर्णिक, मदतनिस ऋतुजा बोरकर, चिराठी अंगणवाडी सेविका सानिका उद्धरकर, सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.