| अलिबाग | प्रतिनिधी |
चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे संजय देशपांडे व प्रज्ञा देशपांडे हे एक तंत्रज्ञान क्षेत्रातील मानांकित नाव आहे. यूएसएस येथे एप्पल कंपनीमध्ये काम केल्यानंतर भारतात येऊन शिक्षण, तंत्रज्ञान, बँकिंग क्षेत्र, कौशल्य विकास आदी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी सुरू आहे. या संस्थेला 25 वर्षपूर्ती करिता विविध शाळांमध्ये सामाजिक दायित्व पोटी भेट देऊन भरीव मदत करीत आहेत.
अलिबाग तालुक्यातील नागाव केंद्रातील हटाळे जिल्हा परिषदेच्या शाळेला मराठी, इंग्रजी अभ्यासक्रमासहित अँड्रॉइड संगणक व पुस्तके भेट देण्यात आली. नागाव केंद्रातील सर्व शाळा व विदयार्थ्यांना याचा लाभ मिळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत असे संजय देशपांडे यांनी सांगितले. या किटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे, त्याचे वापर व फायदे यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर, गणिततज्ञ डॉ. दिलीप देशमुख, प्रवीण ठाकूर, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा अॅड. के.डी पाटील, संचालक मंडळ हायस्कूल नागावचे मुख्याध्यापक अजित पाटील, केंद्रप्रमुख श्री संदीप वारगे व केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावेश्री वाळंज यांनी केले.







