| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात कामधंदा करणाऱ्या श्रमिकांसाठी मुंबई येथील श्री नानीलाल दलिचंद मेहता चॅरिटेबल ट्रस्ट गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहे. माथेरानचे डोंगरात असलेलया आदिवासी वाड्यामधील लोकांसाठी हि संस्था अनेक वर्षे कार्य करीत असून नेहमीप्रमाणे दिवाळी सणांसाठी ट्रस्टच्या वतीने दिवाळी साहित्य आणि मुलांसाठी फटाके, कपडे याचे वाटप केले.
माथेरानमधील मैत्री ग्रुपकडून श्री नानीलाल दलिचंद मेहता चॅरिटेबल ट्रस्टसाठी कार्यक्रमाचे आयोज केले होते. माथेरानमधील आदिवासी लोकांना दिवाळी भेट देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी केंद्रातील लहान बालकांनी गाणे सादर करून पाहुण्यानाचे स्वागत केले. यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालके यांना खाऊ आणि कपड्यांचे वाटप केले. तर आदिवासी कुटुंबासाठी मिठाई, फरसाण, तेल, बेसन, साखर, गुळ, चणाडाळ, मैदा, रवा, मीठ छोटे मोठे असे दोन टॉवेल, केक, चॉकलेट तसेच वही-पेन्सिल आदी साहित्याचे वाटप केले.







