शाळांना शैक्षणिक साहित्य भेट

| नेरळ | वार्ताहर |

नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि एचडीएफसी सिक्युरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ गाव आणि परिसरातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांना संगणक वाटप करण्यात आले.

एचडीएफसी सिक्युरिटी आणि नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, नेरळ विद्या मंदिर आणि नेरळ विद्या विकास या शाळांना संगणक संच वाटप करण्यात आले. नेरळचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि एच डी एफ सी सिक्युरिटी चे पदाधिकारी यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद शाळा कूंभे, आनंदवाडी,कोल्हारे, कन्या शाळा क्रमांक दोन, धामोते, कोल्हारे तसेच आदिवासी विकास आश्रमशाळा माणगाववाडी आदी शाळांना प्रत्येकी एक तर नेरळ विद्या विकास शाळेला तीन संगणक संच भेट देण्यात आले.नेरळ विद्या मंदिर शाळेला 10 संगणक संच देण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी सिक्युरिटीचे उपाध्यक्ष सत्येन दोशी, सहाय्यक उपाध्यक्ष अर्पित पोरवाल, सचिव मितुल पालनकर, सहाय्यक सचिव मिलन सोमाणी तर विद्या मंदिर मंडळ संस्थेचे संयुक्त सचिव विवेक पोतदार, संस्थेचे विश्वस्त मिलिंद पोतदार, नेरळ विद्या मंदिर पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष राजू झुगरे तसेच अमरीश शहा,नेरळ राजा मंडळाचे अध्यक्ष मधुकर मोडक, जयवंत साळुंके, केतन पोतदार, विशाल साळुंके, आशिष सुर्वे, श्याम कडव, अल्पेश मनवे, आदित्य यादव, मंगेश मोरे, यतीन यादव निलेश धरणे, कल्पेश देशमुख, ऋतिक शहा, ओमकार बाचम आदी उपस्थित होते.

Exit mobile version