ग्रंथालयास दीडशेहून अधिक पुस्तकांची भेट

रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलचा अभिनव कार्यक्रम
| खांब-रोहा | वार्ताहर |

रोहा शहरातील डॉ. सी.डी. देशमुख ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिका यांना रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल यांच्या माध्यमातून दीडशेहून अधिक शैक्षणिक पुस्तके भेट देण्याचा अभिनव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. रोहा शहरातील विद्यार्थ्यांना शासनाच्या प्रत्येक विभागातील पदभरती यूपीएसी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग व पोलीसभरती या स्पर्धा परीक्षांची व्यवस्थितपणे तयारी करता यावी, तसेच इंजिनिअरिंग डिग्री व डिप्लोमा, एमबीए, जेईई, नीट परीक्षा आदी शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना रोट्रॅक्ट क्लब रोहा सेंट्रल यांच्यामार्फत पुस्तके देण्यात आली आहेत.

प्रोजेक्ट ज्ञानउदयचे डायरेक्टर पी.एच.एफ. आकाश रुमडे हे रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलचे माजी अध्यक्ष व विकास इन्स्ट्यिूट रोह्याचे संचालक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे वत्सराज, ग्रंथालयक शिंदे मॅडम तसेच रोटरी क्लब अध्यक्ष रो. सूचित पाटील, डॉ. बुधे, रो. दिवकर आणि रोट्रॅक्ट क्लब रोहा सेंट्रल अध्यक्ष धैर्या वत्सराज, आकाश रुमडे, सत्येन देशपांडे, रोहित पतंगे, यश शिंदे, सार्थक शिंदे, आशुतोष नांदगावकर, श्रुतीला भोईर, सूरज उंदरे आदी उपस्थित होते.

उपक्रमाचे कौतुक
आता पुस्तकांची संख्या वाढल्याने स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत जाणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही वाढण्यास ग्रंथालय मोलाची भूमिका बजावणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितीतांकडून देण्यात आली. तर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल यांच्या माध्यमातून संपन्न करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत होताना दिसत आहे.

Exit mobile version