आरोग्य केंद्रास नवजात शिशु उपयोगी वस्तू भेट

। पेण । प्रतिनिधी ।
ग्राम संवर्धन सामाजिक संस्था ही रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात प्रश्‍नांवर काम करत असताना त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी न्यायालयासोबत त्यांच्या गरजा ओळखून आपल्या सहयोगी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारचे मदत करत असते. अशीच मदत शनिवारी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कामार्ली येथे राम संवर्धन सामाजिक संस्थेने केली आहे.

कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांच्या प्रयत्नाने पेण तालुक्यातील आदिवासींची संख्या जास्त कामालीर्र् प्राथमिक आरोग्य केंद्रास नवजात शिशु उपयोगी गाद्या, दुपटी पन्नास नग झबले शंभर नग,उलन टोपरी सव्वीस नग, बेबी टालकॅम पावडर, बेबी लोशन, बेबी मसाज ऑइल, यासह पाच लिटर सॅनिटायझर अशा वस्तू भेट देण्यात आल्या शनिवारी 4 मार्च रोजी कोकण कट्टाचे सदस्य आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ठाकूर कोकण कट्टा सदस्य अरविंद गुरव, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या मानसी पाटील,सचिन गावंड, नरेश पाटील, आनंद गावंड आणि सचिन पाटील यांनी कामार्ली येथे जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी डॉ. संजय ठाकूर यांनी वात्सल्य ट्रस्ट, कोकण कट्टा आणि ग्राम संवर्धन संस्थेचे आभार ऐंशी टक्के आदिवासी स्त्रियांची प्रसूती होत असलेल्या या आरोग्य केंद्रास दिलेल्या वस्तूंचा उपयोग करण्यात येईल, असे सांगितले.

Exit mobile version