गिरगांवकर संस्थेचा ‘रंग दे माझी शाळा’ उपक्रम

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
आम्ही गिरगांवकर संस्थेचा रंग दे माझी शाळा हा शाळा रंगविण्याचा उपक्रम ही शैक्षणिक गुणवत्तेला प्रगतीपथावर नेण्याची सुरूवात असल्याची ग्वाही संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी दिली.
याप्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे उपाध्यक्ष शशांक धारगळकर, सचिव मिलींद वेदपाठक, सचिव शिल्पा नायक,सदस्य कुणाल लिमजे यांच्यासह वनविभागाचे अशासकीय सल्लागार मंदार गडकरी, प्रांताधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी नायब तहसिलदार सुरेश खोपकर, तहसिल कार्यालयाचे प्रतिनिधी मंडल अधिकारी मुंडेकर, सरपंच शिवराम पवार, उपसरपंच निलेश साळुंखे, माजी उपसभापती संभाजीदादा साळुंखे, माजी सरपंच रामचंद्र साळुंखे, प्रदीप नरे, प्रदीप सुर्वे व रघुनाथ वाडकर, हरिश्‍चंद्र साळुंखे, अशोक नरे, दिलीप नरे, पांडूरंग नरे, डॉ.राहुल निकम, तलाठी वार्डे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक दिक्षित यांनी, लोहारे ही रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल म्हणून निश्‍चित झाली असून शाळेच्या विविधांगी विकासासोबतच काही महत्वाच्या भौतिक बाबींची पूर्तता करण्याची गरज असून आम्ही गिरगांवकर या संस्थेने आवर्जून या गरजेची पूर्तता करण्याचे आवाहन केले. प्रारंभी लोहारे येथील राजिप प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागतगीत गायन केले. यावेळी सूत्रसंचालन निकम यांनी केले.

Exit mobile version