। सांगली । प्रतिनिधी |
कॉलेजच्या मैत्रिणीनं सोबत दंडोबा डोंगरावर सहलीला निघालेल्या मुलीचा एसटीच्या चाका खाली येऊन मृत्यू झाला. शर्वरी राजकुमारी कुलकर्णी असे मृत तरुणीचे नाव आहे. शर्वरी घरच्यांची परवानगी घेऊन निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दंडोबा डोंगरावर निघाली होती. तिच्या काही मैत्रिणी पुढे गेल्या होत्या व ती मोपेडवरून जात होती. मात्र घरापासून काही अंतरावर जाताच एसटी बसच्या मागील चाक खाली येऊन तिचा तिथेच मृत्यू झाला.







