शॉक लागून मुलीचा मृत्यू

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तक्का दर्गा परिसरात विजेचा शॉक लागून एका दहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फातिमा लालसाहब शेख असे या मुलीचे नाव आहे .फातिमा पाचवी इयत्तेत शिकत असून ती शाळेतून घरी आल्यानंतर बाहेर खेळत होती. यावेळी विद्युत डीपीच्या जवळ तिला अचानक शॉक लागला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version