उद्यापासून मुलींची क्रिकेट निवड चाचणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे 15 वर्षांखालील मुलींची क्रिकेट निवड चाचणी 5 व 6 निव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. भेंडखळ क्रिकेट अकादमी मैदान,भेंडखळ-उरण येथे ही चाचणी होणार आहे. या चाचणीतून रायगडचा मुलींचा संघ निवडण्यात येणार अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली.

1 सप्टेंबर 2007 रोजी अथवा त्यानंतर व 31 ऑगस्ट 2009 पुर्वी जन्मलेल्या जिल्ह्यातील मुली या निवड चाचणीत पात्र ठरतील. पांढरा क्रिकेट गणवेश घालुन मुलींनी मौदानावर सकाळी 8 वाजता मुलींनी उपस्थीत राहणे आवश्यक आहे. यासाठी मुलींनी आपली नोंदणी करणे गरजचे आहे. त्यासंदर्भातील फॉर्म जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या फेस बुक पेज वर (ीवलर2017) उपलब्ध आहे.

नोंदणी केलेल्या मुलींनाच चाचणीत प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संदीप पाटील, 8369789385, विनय पाटील 9082582905, मनीषा अडबल 9970062148, प्रीतम कैया 9322243534 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे मते यांनी केले आहे.

Exit mobile version