नागपुरात गर्ल्स हॉस्टेलला आग

| नागपूर | वृत्तसंस्था |

नंदनवन येथील निर्मल उज्ज्वल अर्बन क्रेडिट को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या मुख्य शाखेजवळ असलेल्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलिंडर लिकेजमुळे रात्री आठ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत किचनमधील सामानासह फ्रिज, डायनिंग टेबल, एसी यासह बाहेरपर्यंत आग आल्याने समोर असलेल्या दोन मोपेड जळाल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

नितीन व्यंकटेश माटे आनंदनगर यांच्या मालकीचे गर्ल्स हॉस्टेल आहे. या गर्ल्स हॉस्टेलच्या किचनमध्ये ठेवलेल्या सिलिंडरमधून वायू गळती होत असल्याने त्याने अचानक पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण आग ही किचनसह बाजूच्या रुममध्ये पसरली. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच, दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी काही वेळातच, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले

Exit mobile version