अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये मुलीची बाजी

। आगरदांडा । प्रतिनिधी ।       
मुरुड अंजुमन इस्लाम हायस्कूल शाळेचा सायन्सचा निकाल 90.67 टक्के तर आर्टसचा निकाल 73.68 टक्के एवढा लागला आहे. सायन्समधून मनाल हिफाजान उलडे 77.83 टक्के गुण मिळून सर्व प्रथम, सहिमा ए.सलाम मुकादम हिने 77.67 टक्के गुण मिळून व्दितीय क्रमांक तर महेक गोलंदाज हिने 72.67 टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला.
 

सायन्समधून 117 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्या पैकी 106 विद्यार्थी पास झाले तर 11 विद्यार्थी नापास झाले. यावर्षी ही अव्वल स्थानी मुलीच राहिलेल्या दिसून आल्या. आर्ट्सचा निकाला 73.68 टक्के लागला असुन या मधून सुबिया शाहिद कलाब  हिला 67.50 टक्के गुण मिळून प्रथम, झाहिरा इब्राहिम खान हिला 65.17 टक्के गुण मिळून व्दितीय तर उजमा रईस बागवान हिला 60.83 टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी ही मुलीच अव्वल स्थानी राहिल्या आहेत. आर्टसमधून 57 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्या पैकी 42 विद्यार्थी पास झाले तर 15 विद्यार्थी नापास झाले आहेत. सायन्स मधून प्रथम गुण मिळवणारी  मनाल हिफाजान उलडे हिचा सत्कार यानी केला. यावेळी जाहिद हुसेन इस्लाईल गोटेकर, अब्दुल रहिम कबले, हिफाजान उलडे उपस्थित होते.

Exit mobile version