। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण येथील बंदरातून स्थानिक वाहतूकदारांना डावलून परप्रांतियांच्या अवजड गाड्यांमार्फत कोळशाच्या वाहतुकीचे काम कंपनीतून केले जात आहे. परप्रांतियांकडून होणार्या कोळसा वाहतुकीचे काम यापुढे स्थानिक वाहतूकदारांनाच देण्यात यावे, अन्यथा सोमवारी बंदरातील कंपनीतून होणारी कोळसा वाहतूक बंद करण्याचा इशारा उरण-पनवेल लॉरी मालक-चालक संघटनेने पोलीस, तहसीलदारांना दिला आहे.
उरण येथील एका बंदरातील कंपनीतून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. दररोज या कंपनीतून हजारो टन कोळशाची वाहतूक केली जाते. मात्र, कोळसा वाहतुकीचे काम स्थानिक वाहतूकदारांना डावलून परप्रांतीय वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. वाहतुकीचे काम स्थानिक वाहतूकदारांनाच देण्यात यावे यासाठी संबंधित कंपनीकडे मागणी केली आहे.







