आधारभूत भात खरेदीचा लाभ शेतकर्‍यांना द्या : आ.जयंत पाटील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना खरीप पणन हंगाम 2022-23 च्या आधारभूत भात खरेदी योजनेचा लाभ मिळावा,अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी सरकारकडे विशेष उल्लेखाद्वारे केली आहे. याबाबत गुरुवारी विधानपरिषदेत उपस्थित झालेल्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले की, खरीप पणन हंगाम 2022 – 2023 च्या आधारभूत भात खरेदी योजने अंतर्गत धान खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना ऑनलाईन पोर्टलवर नाव नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरूवात करण्यात आली.त्यांची मुदत 15 जानेवारी 2023 पर्यंत होती. त्यानुसार अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी सातबारा नाव नोंदी करून ऑनलाईन पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या शेतकन्यांनी भात खरेदी केंद्रावर आपला भात आणून दिला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

परंतु त्यानंतर शासनाने भात खरेदी केंद्रांना एका मर्यादेपर्यंत भात खरेदी करण्याचा इष्टांक देण्यात आला. त्यामुळे भात खरेदी केंद्रावर भात दिलेल्या शेतकर्‍यांच्या भात खरेदी केंद्रांना लॉट एंट्री न करता आल्यामुळे अनेक शेतकरी भात खरेदी योजनेचा लाभ घेण्यापासून बंचित राहिले आहेत.असेही ते म्हणाले. सबब सदर योजनेचा शेतकन्यांना लाभ मिळण्यासाठी शासनाने लॉट एंट्री करण्याची मर्यादा वाढवून देण्यात यावी व वंचित राहिलेल्या शेतकन्यांना खरीप पणन हंगाम 2022-23 च्या आधारभूत भात खरेदी योजनेचा लाभ मिळावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version