द्रोणागिरी स्पोर्ट्सला मैदान द्या

प्रा.एल.बी.पाटील यांची मागणी
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

उरणमध्ये दरवर्षी हजारो खेळाडू द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या महोत्सवात खेळत असतात. 22 वर्षे हा महोत्सव संपन्न होतो आहे. परंतु या स्पोर्ट्ससाठी व हजारो खेळाडूंसाठी उरणचे मैदान नाही ही उरण करांची खंत आहे. उरणला मैदानाची गरज आहे. ती सिडकोने, सरकारने भागवावी असे विचार रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी उरणला जे.एन.पी.टी.मध्ये झालेल्या मउरणला खेळाडूंचा जागरफ या चर्चासत्रात बोलतांना मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव घरत होते. यावेळी बोलतांना प्राचार्य गणेश ठाकूर यांनी महादेव घरत यांनी 22 वर्षांपासून ग्रामीण भागांत केलेली खेळांची प्रगती ही अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तर कॉम्रेड भूषण पाटील यांनी आता द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या मैदानासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे असे सांगून मार्गदर्शन केले. गोपाळ पाटील म्हणाले की पाच वषापासून ऐंशी वर्षांच्या माणसांत देखील तरुणाई जिद्दीने वावरत असते. तिचा वापर करु या.महादेव घरत यांनी द्रोणागिरी स्पोर्ट्सची चळवळ ही सामाजिक यशस्वी भूमिका आहे असे मत सुधाकर पाटील यांनी मांडले. कार्यक्रमास रेखा घरत, डॉ.मनिष पाटील, किरण घरत, किशोर म्हात्रे, भगवान पाटील, निलेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शिवेंद्र म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version