कंत्राटी वीज कामगारांना सुधारित वेतन दर द्या

कंत्राटी कामगार संघांची मागणी

| उरण | वार्ताहर |

कंत्राटी वीज कामगाराना सुधारित वेतन दर देण्याची मागणी कंत्राटी कामगार संघांने केलेली आहे. राज्यात कामगारांच्या करिता 65 पेक्षा जास्त विविध शेड्युल नुसार किमान वेतन दर निश्चीत केले जातात. यामध्ये दर पाच वर्षांनी तत्कालीन महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्याकिमती, ई आधारावर किमान वेतन दर मध्ये सुधारणा करावेत असा किमान वेतन कायद्यानुसार लागु करणे बंधनकारक आहे. पण महाराष्ट्रातील 15 उद्योगातील किमान वेतन दर मुदत संपुनही 7/8 वर्ष सुधारित वेतन दर अद्याप पर्यंत लागू केले नाहीत. त्यामुळे विविध शेड्युल उद्योगातील हजारो कामगार सुधारित वेतन दरापासून वंचित आहेत.

त्यामुळे प्रलंबित सुधारित वेतन दर फरका सहित देण्यासाठी मागणी ठेकेदार कामगार संघ, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने महाराष्ट्रातील लाखो कंत्राटी कामगारांच्या वतीने कामगार आयुक्त सतीश देशमुख यांना संघटनेच्या पदाधिकारी यांनी कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा मुंबई येथे देवून कामगारांच्या विविध व्यथा मांडून दिलेली आहे. यावेळी अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार उपमहामंत्री राहूल बोडके व कोषाध्यक्ष सागर पवार उपस्थित होते.

Exit mobile version