विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी वेळ द्या – पालकमंत्री

म्हसळा | वार्ताहर |
मुलांना शिक्षणा बरोबरच कला, क्रीडा आणि स्व-संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे आज कराटे,कळा आणि क्रीडा क्षेत्राची नितांत गरज असल्याचे मत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
म्हसळा क्रीडा संकुल येथे चँपीयन कराटे क्लबने आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धांचे उदघाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. म्हसळा सावर येथे उभारण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलात आयोजित करम्यात आलेल्या कराटे स्पर्धा उदघाटन अलीशेट कौचाली, समीर बनकर,जि.प.सभापती बबन मनवे,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,प्रांताधिकारी समीर शेडगे, तहसीलदार समीर घारे,पोलिस निरीक्षक उध्दव सुर्वे, नाझीम हसवारे, उज्वला सावंत, जयश्री कापरे, संतोष सावंत सुबान हलदे, अंकुश खडस,स्पर्धा आयोजक अभय कलमकर,मनोहर तांबे,संतोष उद्गरकर,खांडेकर आदी उपस्थित होते.
म्हसळा तालुका नियोजित दौर्‍यावेळी त्यांचे हस्ते म्हसळा नगर पंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ता,गटार बांधकामाचे उदघाटन आणि घोणसे ग्राम पंचायती मधील वडाचीवाडी,म्हशाचीवाडी येथील मंजूर अंतर्गत रस्ता बांधकामाचे व ग्राम पंचायत इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते संपन्न झाले.

Exit mobile version