विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवनदान

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील एका सार्वजनिक विहिरीमध्ये एक भटका कुत्रा पडला होता. त्याला विहिरीतून काढून येथील किहीम ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पिंट्या गायकवाड यांनी जीवनदान दिले आहे.

अलिबाग तालुक्यातील किहीम ग्राम पंचायत अंतर्गत असणाऱ्या मौजे चोंढी येथील एका सार्वजनिक विहिरीमध्ये आज सकाळी एक भटका कुत्रा फिरत असताना पडला होता. कुत्रा विहिरीत पडला असल्याचे योगिता जाधव यांनी पाहिले. योगिता जाधव यांनी वेळ न घालवता ताबडतोब पिंट्या गायकवाड यांना फोन करीत सर्व हकीगत सांगितली. योगिता जाधव यांनी माहिती देताच ताबडतोब घटनास्थळी येऊन पाहिले तर विहिरीत पडलेला कुत्रा जीव वाचविण्यासाठी तडफडत होता. पिंट्या गायकवाड हे खोल विहरित उतरून त्यांनी भटक्या कुत्र्याला विहिरीच्या कडेला आणले, नंतर त्यांचे सहकारी यांना विहिरीत एक ट्रे सोडण्यात सांगितले. विहिरीत सोडलेल्या ट्रेवर बसवीत त्याला विहिरीबाहेर खेचून जीवनदान दिले आहे.

यावेळी पिंट्या गायकवाड यांना यावेळी बंड्या संदीप, योगिता जाधव, सिद्धेश गुद्द्या, साई सेवा मिठाईवाले, तसेच सारळ येथील नाईक यांनी मोलाची मदत केली.

Exit mobile version