ग्लेन मॅक्सवेल पुन्हा गोल्डन डक

। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात बेंगळुरूचा आयपीएलमधील प्रवास संपला. तर, राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये पोहोचला. दरम्यान, या सामन्यात आरसीबीला ग्लेन मॅक्सवेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण या सामन्यातही त्याची बॅट शांत राहिली. हा आयपीएल हंगाम मॅक्सवेलसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात मॅक्सवेल गोल्डन डकवर बाद झाला.

ग्लेन मॅक्सवेल हा एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो, पण आयपीएल 2024 मध्ये त्याची बॅट एकदम शांत राहिली. या हंगामात त्याने 10 डावात 43 चेंडूंचा सामना करत फक्त आणि फक्त 52 धावा केल्या. या हंगामात मॅक्सवेलचा स्ट्राइक 120 आहे आणि सरासरी 5.8 राहिली. आणि या हंगमाता मॅक्सवेल 4 वेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅक्सवेलला आरसीबीने 11 कोटी रुपयांना खरेदी करून संघाचा भाग बनवला होता. अशा परिस्थितीत, या हंगामात त्याच्या एका धावेची किंमत पाहिली तर ती 2,115,385 रुपये आहे. दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलच्या आयपीएलमधील कामगिरीवर भारतीय संघाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण संतापला आहे. मॅक्सवेल शुन्यावर बाद झाल्यानंतर इरफान पठाणने ट्वीट करुन आपला संताप व्यक्त केला आहे. मॅक्सवेल काय करतोय,असे ट्विट इरफान पठाणने केले आहे.

नकोशा विक्रमाची बरोबरी
ग्लेन मॅक्सवेलने शुन्यावर बाद होत एका नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये 18 वेळा शुन्यावर बाद होण्याचा विक्रम दिनेश कार्तिकच्या नावावर होता. मात्र, राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये शुन्यावर बाद मॅक्सवेलने देखील त्याची बरोबरी केली आहे. मॅक्सवेलनंतर या यादीत रोहित शर्मा दुसर्‍या स्थानी आहे. तसेच, ग्लेन मॅक्सवेल आता आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक डकवर आऊट होणारा संयुक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत जोस बटलर आघाडीवर आहे.
Exit mobile version