मॅक्सवेलचे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ग्लेन मॅक्सवेलने नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावून विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामच्या नावावर होता, ज्याने 7 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध या वर्ल्डकप मध्ये 49 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी केली होती. मॅक्सवेलने त्याला अवघ्या 19 दिवसांत मागे टाकले.

नेदरलँड्सविरुद्ध मॅक्सवेलने तुफानी फलंदाजी केली. त्याने 44 चेंडूत 106 धावा केल्या. यादरम्यान नऊ चौकार आणि आठ षटकार मारले. त्याच्या खेळीमुळे कांगारू संघाने 50 षटकांत आठ गडी गमावून 399 धावा केल्या. मॅक्सवेलशिवाय सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने 93 चेंडूत 104 धावांची खेळी केली. विश्वचषकामध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आयर्लंडचा केविन ओब्रायन तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध 50 चेंडूत 113 धावा केल्या होत्या. मॅक्सवेलने यापूर्वी 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत 102 धावा केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 66 चेंडूत 162 धावांची खेळी केली होती. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत सातव्या स्थानावर आहे, ज्याने याच वर्ल्ड कप मध्ये 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत 131 धावा केल्या होत्या.

Exit mobile version