। कणकवली । वृत्तसंस्था ।
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने येथे 37 लाख चार हजार 400 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. कारवाईत नऊ लाखांचा टेम्पोही जप्त केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर येथील गड नदी उड्डाणपुलाजवळ सोमवारी (ता. 7) रात्री साडेनऊच्या दरम्यान ही कारवाई झाली. याप्रकरणी पथकाने चालक मोहन शंकर जोशी (रा. उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे.
याबाबत विभागाने दिलेली माहिती अशी अधिकार्यांना गोवा बनावटीची दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्कच्या सिंधुदुर्ग विभागातील कणकवली पथकाने वाहनांची तपासणी केली. पथकाने संशयावरून एक चॉकलेटी मोठा टेम्पो (एमएच 49- 3471) थांबविला. टेम्पो सीलबंद होता. सील तोडून तपासणी केली असता टेम्पोमध्ये वैद्यकीय बिलांच्या नावाखाली चोरट्या पध्दतीने दारूची वाहतूक सुरू असल्याचे आढळले. अशा दारूचे 295 बॉक्स व बिअरचे 40 बॉक्स जप्त करण्यात आले. त्याची अंदाजे किंमत 37 लाख 4 हजार 400 तर टेम्पोची किंमत नऊ लाख असा एकूण 46 लाख चार हजार 400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोवा बनावटीची दारू जप्त
