देवाचे पैस चोरीला…

। अलिबाग । वार्ताहर ।
नागाव येथील दत्त मंदिरात अज्ञात चोरटयांनी दानपेटीतील पैसे चोरल्याची घटना घडली. अलिबाग ठाण्यात दि.2 ते 3 ऑक्टोबर रोजी 8 च्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी मौजे नागाव मधील गणपती आळी येथील आरेकर मुरलीधर दत्त मंदीरात उघडया दरवाज्यावाटे आत प्रवेश करून दोन दानपेटया पैकी एक दानपेटी चोरून नेली. तसेच दुस-या दानपेटीचा लॉक तोडुन त्यातील एकूण 700/- रुपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्व:ताचे फायदयाकरीता चोरली. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version