| रायगड | प्रतिनिधी |
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमधील वाद शिगेला पोहोचलेला असताना राज्य सरकारने परिपत्रक काढून 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाने स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या मंत्री भरत गोगावले यांना धक्का बसला आहे. तसेच भरतशेठ यांनीच पालकमंत्री होऊन ध्वजारोहण करावे, अशी इच्छा शिवसेनेतील अनेक नेते, मंत्री बोलून दाखवत होते. त्यांचीही इच्छा राज्य सरकारच्या परिपत्रकाने धुळीला मिळाली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद आहे. भरत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांनीही हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी पालमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उभा ठाकला होता. मात्र, राज्य शासनाने परिपत्रक काढून आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे.







