| श्रीवर्धन | वार्ताहर |
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी, डॉ.कल्याणी नाझरे, प्रा.सागर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले होते. अध्ययन अतिरिक्त विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, क्ले मॉडेलींग, निबंध स्पर्ध, पुष्परचना स्पर्धा, पोस्टर मेकिग स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा आदींचे आयोजन सांस्कृतिक विभागांतर्गत करण्यात आले होते. तर क्रीडा विभागांतर्गत थाळीफेक, लांब उडी, कॅरम, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी व क्रिकेट या स्पर्धांचे वरिष्ठ व कनिष्ठ विभागांचे स्वतंत्रपणे आयोजन करण्यात आले होते.
स्नेहसंमेलनाअंतर्गत समूहनृत्य, समूहगीत गायन, हिंदी-मराठी गीत गायन, एकपात्री अभिनय, लावणी, पोवाडा, वैयक्तिक नृत्य, मिमिक्री, नालवादन व विविध प्रकारचे नृत्याविष्कार अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले. या विविध स्पर्धांच्या आयोजनासाठी उप प्राचार्य किशोर लहारे, डॉ.कल्याणी नाझरे, प्रा.सागर कुंभार, डॉ. वाल्मिक जोंधळे, प्रा.पंकज गमे, डॉ.निलेश चव्हाण, प्रा. दिपाली पाठराबे, प्रा.संतोष लंकेश्वर, डॉ.योगेश लोखंडे, प्रा.नवज्योत जावळेकर व अन्य सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मेहनत घेतली.







