आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये भारताला सुवर्ण महत्वाचे

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

हॉकी इंडियासाठी एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक फार महत्वाचं; नाही तर गाठावं लागेल पाकिस्तान अशी प्रतिक्रिया हॉकी संघटनेटे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी सांगितल. भारतीय पुरूष हॉकी संघ 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या हांगझू येथील आशियाई स्पर्धतून पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी थेट पात्र होऊ शकतो. मात्र जर यात अपयश आलं तर भारतीय हॉकी संघाला पाकिस्तानचा दौरा करावा लागले. त्याशिवाय पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र होता येणार नाही,अशी माहिती तिर्की यांनी दिली.

नियमानुसार, आशियाई स्पर्धेत 2023 मध्ये जो संघ सुवर्ण पदक पटकावेल तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होईल. मात्र इतर देशांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. यावेळी या पात्रता फेरीचं आयोजन पाकिस्तान आणि स्पेनची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानला जाण्यासाठी भारत सरकारची परवानगी लागते. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय हॉकी संघाला पाकिस्तानला जावं लागेल. त्यावेळी केंद्र सरकार काय भूमिका घेते हे पहावे लागले.असेही त्यानी सांगितले.

आम्ही हांगझूमध्येच मोहीम फत्ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र काही कारणास्तव आम्ही पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होऊ शकलो नाही तर क्वालिफायर सामन्यासाठी आम्हाला पाकिस्तान किंवा स्पेन दोन्हीपैकी कुठेही जावे लागेल

दिलीप तिर्की, हॉकी संघटना अध्यक्ष
Exit mobile version