गळ्यातील सोन्याचे पान चोरीला

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पाच वर्षीय मुलगा खेळत असताना त्याच्या गळ्यातील धागा कापून सोन्याचे पान चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत चोरट्याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कळंबोली सेक्टर 1 मधील सुनील डोंबाळे यांचा पाच वर्षीय मुलगा घरासमोर गल्लीत खेळत होता. यावेळी एका व्यक्तीने त्याच्या गळ्यातील धागा कापला आणि त्यातील साडेचार हजार रुपयांचे सोन्याचे पान चोरून नेले.

Exit mobile version