| अलिबाग | वार्ताहर |
नुकत्याच झालेल्या पेण तालुका क्रीडा संकुलमध्ये जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत सांबरी गावाचा सुपुत्र दर्पण नितीन पाटील याने 14 वर्ष आणि 60 किलोवरील वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. दर्पण हा इयत्ता नववीत शिकत आहे.
दर्पण कराटे क्लाससाठी संतोष कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंदिर ब्राह्मण आळी अलिबाग येथे शिकत आहे. दर्पणने सुवर्ण कामगिरी केल्यामुळे सांबरी गावाचे सामाजिक कार्यकर्ते आणि महाशिवरात्री सांबरी गावाच्या मंडळाचे अध्यक्ष सुभाष शेळके महाराज तसेच मंडळाचे कार्यकर्ते सुधीर शेळके, रवींद्र शेळके, सुजन गजमले आणि मित्रमंडळी यांनी दर्पणला शुभेच्छा दिल्या. तसेच, दर्पणच्या यशाचे श्रेय त्याचे वडील नितीन गोमा पाटील व आई अंजनी पाटील तसेच कराटे मुख्य प्रशिक्षक आणि जिल्हा संघटनेचे सचिव संतोष रामचंद्र कवळे नवगाव यांना जाते, असे सुवर्णपदक विजेते दर्पण पाटील याने सांगितले. तसेच त्याला रोहन गुरव रामनाथ अलिबाग आणि जिग्नेश कोळी अलिबाग कोळीवाडा यांचे मार्गदर्शन लाभले.