नॅशनल किक बॉक्सिंगमध्ये पनवेलच्या साहिल सिनारेला सुवर्णपदक

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील दुंदरे येथील साहिल हनुमान सिनारे याने नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. 26 ते 30 डिसेंबर 2021 रोजी बालेवाडी, पुणे येथे नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पनवेलच्या दुंदरे येथील साहिलने घवघवीत यश संपादित करीत पनवेलच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे. साहिलच्या यशाबद्दल पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी अभिनंदन करून साहिलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेत साहिलने एकूण चार फेर्‍या लढल्या. स्पर्धेच्या अंतिम फेरीत साहिल सिनारे विरुद्ध तेलंगणा येथील खेळाडू यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत साहिलने तेलंगणाच्या खेळाडूचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. तसेच थायलंड येथे होणार्‍या वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत साहिलची निवड झाली असून साहिलचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षावही होत आहे. साहिलला वेळोवेळी डॉ. मंदार पनवेलकर आणि कोच निलेश भोसले (युनायटेड शतकोन कराटे असोसिएशन ऑफ इंडिया) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशात आई-वडील आणि प्रीतम म्हात्रे यांचा मोलाचा वाटा असल्याचेही साहिलने मनोगत व्यक्त करताना सांगितले.

Exit mobile version