इटलीच्या जेकॉब्जला सुवर्ण

| टोक्यो | वृत्तसंस्था |
इटलीच्या मार्सेल जेकॉब्जने ऑलिम्पिकमधील सर्वात प्रतिष्ठेच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. यासाठी त्याने 9.8 सेकंद अशी वेळ नोंदवली. या स्पर्धा प्रकारातील इटलीचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. अमेरिकेच्या फ्रेड केर्लीने रौप्य आणि कॅनडाच्या आंद्रे डीग्रेसीने कांस्यपदक मिळवले. उसेन बोल्टने निवृत्त होण्याआधी 13 वर्षे या 100 मीटर शर्यतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

Exit mobile version