सुवर्ण महोत्सवी धार्मिक कार्यक्रम

खेळ पैठणीसह मोफत आरोग्य शिबिर

। चणेरा । वार्ताहर ।

सालाबादप्रमाणे यावर्षी दि.9 व 10 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजता धार्मिक कार्यक्रम तसेच, सायंकाळी कीर्तनकार अजय साळावकर यांची शृश्राव्य कीर्तनरुपी सेवा तसेच, भजनरुपी ईश्‍वरसेवा स्व.स्वरूप सांप्रदाय भजन मंडळ न्हावे-सोनखार यांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले. रात्री दहा वाजता खास महीलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा घेण्यात आला. यासाठी पैठणीसह विशेष 11 आकर्षक पारितोषिक महिलांना देण्यात आले. यावेळी एकूण 70 महीलांनी भाग घेतला होता. गिता गायकवाड या पैठणीच्या मानकरी ठरल्या.

यावेळी रुपेश पाटील, दर्शना पाटील, विकास भायतांडेल, सरपंच नितीन डबीर, पांडुरंग कासकर, प्रफुल्ल झुरे, दत्तात्रेय भायतांडेल, मनोहर डबीर, मंगेश पाटील, गजानन पुळेकर, राज पुळेकर, गणेश सुर्वे, महीला, ग्रामस्थ तसेच संपुर्ण आडाव परिवार उपस्थित होते.

शनिवारी (दि.10) सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मेडिकल फाउंडेशन रोहा व आडाव परिवार न्हावे यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मधुमेह, रक्त तपासणी, ई.सी.जी यासारख्या तपासण्या करण्यात आल्या असून 70 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

Exit mobile version