| रसायनी | प्रतिनिधी |
भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड व शुभ्रा प्रकल्प आयोजित जागर युनिफाइड संकल्पनेच्या अंतर्गत संस्थापक भाग्यश्री वर्तक यांच्या पुढाकाराने दि. 1 व 2 डिसेंबर या दोन दिवसीय ‘फळ व भाज्या प्रक्रिया’ कार्यशाळेचे उद्घाटन दि. 1 डिसेंबर रोजी गुरुकुल सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रेन येथे डॉ. मेधा सोमैया यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी फळ व भाज्या प्रक्रियेच्या माध्यमातून विशेष दिव्यांग जनजागृती व रोजगाराच्या सुवर्णसंधी निर्माण होतील, असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तर, व्होकल फॉर लोकलसाठी अशा प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे मत संचालक डॉ. विजय कोकणे यांनी व्यक्त केले. भाग्यश्री वर्तक व पत्रकार सुरेश यादव यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरात दिव्यांग बंधू भगिनींसाठी आशा प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली पाहिजेत व याकरिता प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले.
यावेळी जन शिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा व स्पेशल ऑलोम्पिक भारत महाराष्ट्राच्या अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, संचालक डॉ. विजय कोकणे, डॉ. सौरभ सरीन, मुंबई विभाग महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे अध्यक्ष सुरेश यादव, शुभ्रा प्रकल्पच्या संस्थापक भाग्यश्री वर्तक, मुख्याध्यापिका उज्ज्वला सुरंगे, विशेष शिक्षक डॉ. अतुल जाधव, विशेष शिक्षक संस्थापिका पौर्णिमा रामचंद्र, जव्हेरी ठाणावाला कर्णबधिर विद्यालययाच्या मनिषा गवळे, सहाय्यक प्रज्वल कदम व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे व प्रशिक्षक सिद्धी साळुंके, वैष्णवी साळुंके, हिमांशू भालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
फळ, भाज्या प्रक्रियेच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगाराची सुवर्णसंधी
