महिलांना प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

| रायगड | वार्ताहर |

नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया (नुसी ) च्यावतीने 8 मार्च रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘न्यूसी स्त्री शक्ती सपोर्ट’ ही खास महिलांसाठी कल्याणकारी योजना सादर केली आहे . नौवहन क्षेत्रात जास्तीतजास्त महिलांचा सहभाग होण्यासाठी, महिलांना प्रवेशासाठी प्रोत्साहित करण्यासाठी न्यूसीतर्फे हा उपक्रम राबविला जाणार आहे.

ट्रेनिंग शिप रेहमान येथे 1 जुलै 2023 रोजी सुरू झालेल्या जीपी रेटिंग कोर्ससाठी देशभरातील 18 महिला प्रशिक्षणार्थिंना न्यूसी तर्फे आर्थिक मदत केली गेली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना जहाज ऊद्योगांनी नोकरी दिलेली आहे. लैगिंक समानतेच्या दिशेकडे न्यूसीने हे एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जुलै 2024 ‘न्यूसी अँकेडमी गोवा बँच’ साठी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत. अँग्लो इस्टर्न शिपिंग कंपनी तर्फे त्यांना जहाजावर नोकरीची हमी दिली जाईल तसेच अगदी कमी खर्चात त्यांचे प्रशिक्षण नुसी तर्फे केले जाईल. आपल्या जिल्ह्यातील तरूण महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन न्युसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी केले आहे.

Exit mobile version