सायकल व्यवसायाला येणार सुगीचे दिवस


पेट्रोल दर 100 रुपयाच्या वर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
दिवसेंदिवस पेट्रोल दरात प्रचंड मोठ्या वाढ होत असून त्याचे दर शंभर रुपयाच्या वर 101.74 रुपयांवर गेला असुन ते दर अधिक वाढले जाण्याची दाट शक्यता असल्याने सर्वसामान्य जनतेला गाडी चालवणे न परवडणारे असल्यामुळे पुन्हा एकदा सायकल चालवणे अधिक सोयिस्कर होईल यामुळे सायकल व्यवसायाला परत सुगीचे दिवस येणार आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासुन सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. अशातच महागाईने कळस गाढला आहे. तर पेट्रोलचे दर 100 रुपयांच्यावर गेल्याने दिवसभर काम करुन तीनशे रुपये कमवणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना गाडी सर्व्हिसिंग व पेट्रोल हे न परवडणारे आहे. यामुळे गड्या आपली सायकल बरा! अशी बोलण्याची वेळ आली आहे.

याशिवाय दिवसेंदिवस अनेक रोगांचे प्रमाण ही वाढत असल्याचे दिसुन येत आहे. यावर कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी शरीर सुदृढ असणे गरजेचे आहे. यामुळे सायकल चालवून आपल्या शरीराच्या हालचालीमुळे शरीर सदृढ व निरोगी होऊ शकतो व तुम्ही कोणत्याही आजरावर मात करु शकता असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात असुन लोकांनी सायकल चालवणे गरजेचे आहेत. तर सर्वसामान्य जनतेचे पेट्रोलचे लागणारे पैशांची ही बचत होईल यामुळे सायकल व्यवसायाला ही सुगीचे दिवस येतील.

Exit mobile version