चेन्नईसाठी पराभवानंतरही आनंदाची बातमी

ऋतुराजने केले कोहलीचे संस्थान खालसा

| मुंबई | वृत्तसंस्था |

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडने बुधवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सत्रातील चौथ्या अर्धशतकानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विराट कोहलीला मागे टाकले. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने विराट कोहलीकडून आयपीएल 2024 ची ऑरेंज कॅप हिसकावून घेतली आहे. ऋतुराज गायकवाडने पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतक ठोकून सर्वाधिक धावांच्या बाबतीत कोहलीला मागे टाकले आहे.

सीएसकेचा सलामीवीर रुतुराजने पंजाबविरुद्ध 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएल इतिहासातील सर्वात संथ अर्धशतकांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2024 मध्ये बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध 48 चेंडूत 62 धावा केल्या. यासह त्याने स्पर्धेतील आपल्या धावांची संख्या 509 वर नेली. आयपीएल 2024 मधील सर्वाधिक धावा आहेत.

या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होता. या टी-20 लीगमध्ये विराटने 10 सामन्यांमध्ये 500 धावा केल्या आहेत. ऋतुराजने 10 व्या सामन्यातही विराटला मागे सोडले. आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली आणि रुतुराज गायकवाड यांचा जवळपास सारखाच रेकॉर्ड आहे. या दोन्ही फलंदाजांनी स्पर्धेत 70 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाज 10 पैकी 3 सामन्यात अपराजित राहिले. दोघांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. विराटने 4 आणि ऋतुराजने 3 अर्धशतके झळकावली आहेत.

विराट कोहली (147.49) देखील स्ट्राइक रेटच्या बाबतीत रुतुराज (146.89) पेक्षा किंचित चांगल्या स्थितीत आहे. दरम्यान, ऑरेंज कॅपच्या या यादीत साई सुदर्शन 418 धावांसह तिसर्‍या स्थानावर आहे. केएल राहुल (406) चौथ्या आणि ऋषभ पंत (398) पाचव्या स्थानावर आहे. आयपीएल 2024 च्या 49 व्या सामन्यापर्यंत (चेन्नई विरुद्ध पंजाब) फक्त 4 फलंदाज 400 हून अधिक धावा करू शकले आहेत. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगचा 49 वा सामना 1 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चांगली कामगिरी करत पंजाब संघाला मोसमातील चौथे यश मिळवण्यात यश आले. पंजाबच्या या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीतील उत्साह वाढला आहे.

Exit mobile version