कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी

दिवाळी हंगामात धावणार विशेष रेल्वे गाड्या

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या सुट्टीत गावी कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिवाळी विशेष गाड्यांची यादी कोकण रेल्वेने जाहीर केली आहे.

दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे गाड्यांची बुकिंग आतापासून फुल होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या काळात रेल्वेत होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नियमित गाड्या व्यतिरिक्त काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या 25 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या काळात चालविण्यात येणार असून त्यामध्ये प्रामुख्याने 01463/01464 एलटीटी कोचुवेली विशेष ट्रेन ( एकूण आठ फेर्‍या) : 01463 विशेष गाडी दिनांक 24 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई स्थानकावरून संध्याकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 10 वाजून 45 मिनिटांला कोचीवेली या स्थानकात पोहोचेल.

1)01464 विशेष गाडी दिनांक 25 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत दर शनिवारी कोचुवेली या स्थानकावरून संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांला लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

2) 01175/01176 पुणे सावंतवाडी पुणे विशेष ट्रेन (एकूण आठ फेर्‍या)01175 : विशेष गाडी दिनांक 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत दर मंगळवारी पुणे या स्थानावरून सकाळी 09 वाजून 35 मिनिटांला सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजून 30 मिनिटांला सावंतवाडी येथे पोहोचेल. 01176 विशेष गाडी दिनांक 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत दर बुधवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री 11 वाजून 25 मिनिटांला सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांला पुणे येथे पोहोचेल.

3) 01177/01178 पनवेल सावंतवाडी पनवेल ट्रेन( एकूण आठ फेर्‍या)01177 : विशेष गाडी दिनांक 22 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत दर बुधवारी पनवेल स्थानकावरून सकाळी 09 वाजून 40 मिनिटांला सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून 05 मिनिटांला सावंतवाडी येथे पोहोचेल. 01178 विशेष गाडी दिनांक 23 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर

पर्यंत दर गुरुवारी सावंतवाडी स्थानकावरून
रात्री 11 वाजून 25 मिनिटांला सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 08 वाजून 40 मिनिटांला पनवेल येथे पोहोचेल.
Exit mobile version