| मुंबई | प्रतिनिधी |
एसटी बसचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारा मानला जातो. परंतु, काहीवेळा एसटीची वाट पाहात तासनतास ताटकळत राहावे लागते. हाच नाहक त्रास आता कायमचा संपणार आहे. आता 15 ऑगस्टपासून लालपरीचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना कळणार आहे. यासाठी 15 ऑगस्टपासून एसटीच्या ॲपची सुरुवात होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही काळापासून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बसचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याची चर्चा होती. आता याबाबत एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका जाहीर केली आहे. यामध्ये एसटी तिकीटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस एसटी स्टॅण्डवर येण्याची गाडीची अचूक वेळ देखील समजणार आहे.






