बुडालेल्या त्या 21 बँकांच्या खातेदारांसाठी खुशखबर

प्रत्येकी पाच लाख रुपये मिळणार; मात्र पेण अर्बन बँकेचा समावेश नाही
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशभरातील बुडालेल्या 21 बँकांमधील खातेदारांना येत्या डिसेंबरपर्यंत किमान 5 लाख रुपये मिळणार आहे.मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या 21 बँकांच्या यादीत रायगडातील पेण अर्बन बँकेचा समावेश करण्यात आलेला नाही.

भ्रष्टाचाराच्या कारणांमुळे रिझर्व बँकेने देशभरातील 21 बँकांना यापूर्वीच टाळे लावले आहे.त्यामुळे या बँकांतील कोट्यवधी ठेविदारांची कोट्यवधींची गुंतवणूक बुडित निघाली आहे.यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने गेल्या महिन्यात ठेव विमा आणि पतहमी महामंडळ सुधारणा विधेयक मंजूर केले आहे.त्यानुसार आरबीआयने बँकांवर स्थगिती लागू केल्याच्या 90 दिवसांच्या आत खातेदारांना 5 लाख रुपये मिळणार आहेत.

बँकांच्या ज्या काही ठेवी ठेवल्या जातात त्यांना विमा संरक्षण दिले जाते.याचा अर्थ असा की जर ती बँक बुडाली तर त्या खातेदाराला पाच लाख मिळणार आहेत.अलिकडच्या काळात पीएमसीसह 21 सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या आहेत.त्यामुळे या बँकांच्या सर्व खातेधारकांना या विम्याअंतर्गत पैसे मिळण्याचा हक्क राहणार आहे.बँकांमधील ठेवीचा विमा,डिपॉॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनद्वारे केला जातो.बँकाच्या विमा उतरविलेल्या ठेवीदारांना पैसे देण्याची योजना आहे.हे पैसे डिसेंबरपर्यंत मिळू शकतात.

यामध्ये पीएमसी ही सर्वात मोठी बँक आहे.काही आवश्यक सुचना त्या बँकांना दिल्या आहेत.बँकांना 45 दिवसांच्या आत आपले दावे सादर करावे लागतील.त्यानंतर या दाव्यांची छाननी केली जाईल पडताळणी केल्यानंतर पुढे 45 दिवसात बँकांना पैसे दिले जातील आणि ते पैसे खातेदारांना दिले जातील.याचा अर्थ 29 नोव्हेंबरपर्यंत बँकांच्या दाव्यांची छाननी केली जाईल.यापूर्वी विम्याची रक्कम 1 लाखापर्यंत होती.

याच त्या 21 बँका
अदूर को.ऑप,केरळ,बिदर महिला को.ऑप बँका,महाराष्ट्र,सीटी को.ऑप.बँक,महाराष्ट्र,हिंदू बँक,पंजाब,कपोल बँक,महाराष्ट्र,मराठा सहकारी बँक,महाराष्ट्र,मिलात को.बँक,कर्नाटक,नीडस ऑफ लाईफ,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील,पीपल्स को बँक,पीएमसी बँक.रुपी बँक,आनंद बँक,महाराष्ट्र,सीकर बँक,राजस्थान,गुरु राघवेंद्र बँक,कर्नाटक,मुधोळ बँक,कर्नाटक,मंथा अर्बन बँक,सर्जेरावदादा नाईक बँक,इऩडिपेन्डट बँक,नाशिक,डेक्कन अर्बन,कर्नाटक,गृह ऑफ बँक,मध्यप्रदेश,

Exit mobile version