कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग खुला
| खेड | वार्ताहार |
चार वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग सुरु करण्यात आल्याने कोकणवासियांसाठी चांगली बातमी आहे. कशेडी घाटातील बोगद्याचा कोकणात येण्यासाठीचा एकेरी मार्ग शनिवारपासून सुरू करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग शनिवारपासून सुरू झाला असून, मुंबईहून कोकणात येणारी वाहने या बोगद्याचा वापर करू शकतात. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी, दुसऱ्या बोगद्यातील काम अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे. शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित प्रशासन दिवस रात्र काम करून या मार्गावरील चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. पुन्हा दोन्ही मार्गिकेतून वाहन चालकांचा प्रवास सुसाट होणार आहे.