खुशखबर! कर भरण्याची तारीख एक महिन्याने वाढली

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयकर विभागाने कंपन्यांसाठी आयकर रिटर्न भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. प्राप्तिकर विभागाने धर्मादाय धार्मिक संस्था आणि व्यावसायिक संस्थांसाठी आयकर रिटर्न भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवून 30 नोव्हेंबर केली आहे. याशिवाय आयकर विभागाने लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर करण्याची तारीखही एक महिन्याने वाढवली आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात करदाते, ट्रस्ट, संस्था आणि रुग्णालयांना दिलासा मिळेल. सप्टेंबरपर्यंत सुमारे 6.98 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरला आहे.

देशभर आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 होती. त्यानंतर आता करदात्यांना आयटीआर रिटर्न भरण्यासाठी दंड भरावा लागत असून आता देशातील चॅरिटेबल ट्रस्टना (धर्मदाय संस्था) आयकर रिटर्न भरण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे. धर्मादाय ट्रस्ट, धार्मिक संस्था आणि व्यावसायिक संस्थांसाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत एक महिना वाढवून 30 नोव्हेंबर केली असल्याचे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने 18 सप्टेंबर रोजी जाहीर केले.

प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, फॉर्म 10बी/10बीबी मधील कोणताही निधी, ट्रस्ट, संस्था किंवा कोणत्याही विद्यापीठाने किंवा शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थेने 2022-23 साठी लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर करण्याची अंतिम तारीख देखील एक महिन्याने वाढवून 31 ऑक्टोबर 2023 करण्यात आली आहे.

राजकीय पक्ष, निवडणूक न्यास आणि संस्था आणि धर्मादाय व धार्मिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या व्यावसायिक संस्थांद्वारे -7 दाखल केले जाते. सोमवारीच सरकारने सांगितले की कंपन्यांसाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून याशिवाय ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांना अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख एक महिन्याने वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.

Exit mobile version