शिष्यवृत्ती परीक्षेला चांगला प्रतिसाद

87 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनामुळे लांबत गेलेली पाचवी आणि सातवीच्या पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठ महिन्यानंतर 12 ऑगस्ट रोजी पा पडली. विशेष म्हणजे कोरोनाच्या सावटाखाली ऑफलाईन घेण्यात आलेल्या या परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळाला. रायगड जिल्ह्यात पाचवीसाठी 86.90 टक्के तर सातवीसाठी 88 टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावत परीक्षा दिली.
कोरोनामुळेे शाळा सुरु होण्यास पालकांची नकारघंटा मिळत असतानाच पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मात्र पालकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात पाचवीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात 6 हजार 730 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 5 हजार 851 परीक्षार्थींनी हजर रहात परिक्षा दिली. तर 879 विद्यार्थी गैरहजर राहिले. तसेच सातवीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात 4 हजार 107 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 613 परीक्षार्थी उपस्थित होते. तर 494 जण गैरहजर राहिले.

Exit mobile version