उरण स्थानकातून माल वाहतुकीला सुरुवात

स्थानिकांना रोजगाराची संधी

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरणच्या रेल्वे स्थानकातून प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर आता मालवाहतूकीलाही सुरुवात होणार आहे. स्थानकातुन काळ्या तेलाने भरलेली 58 वॅगनची मालगाडी उत्तरप्रदेशकडे रवाना होणार आहे. त्यानंतर या रेल्वे स्थानकाववरुन लवकरच सिमेंटची देखील वाहतूक केली जाणार आहे.

उरण-नेरुळ मार्गावरुन जानेवारी 2023 पासून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.5) काळ्या तेलाची मालगाडी सायंकाळी चार वाजल्यापासून धावायला सुरुवात झाली. जेएनपीए बंदर आणि रासायनिक प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर काळे ऑईल काढले जाते. या काळ्या तेलाचा विविध कामांसाठी आणि वस्तू बनविण्यासाठी वापर केला जातो.त्यामुळे या काळ्या तेलाला देशभरातून मागणी असते. हे काळे तेल टँकरद्वारे पोहचवणे खार्चिक असते. त्यामुळे आता मालगाडीने पोहचवण्याची सुरुवात उरण स्थानकातुन करण्यात येणार आहे. रेल्वेने मालवाहतूकीमुळे वेळ व खर्चाची बचत होणार आहे.

त्यामुळे विविध कंपन्यांच्या शेकडो टॅकरची उरण स्थानकात बुधवारी गर्दी झाली होती. या टँकरमधुन रेल्वे वॅगनमध्ये तेल पंपाने भरण्यात येत होते. या काळ्या तेलाने भरलेले टँकर उत्तरप्रदेशमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती व्यावसायिक जितेंद्र घरत यांनी दिली आहे. तसेच, याच स्थानकातुन सिमेंटची वाहतूक देखील होणार आहे. या उरण रेल्वे स्थानकातुन मालवाहतुकीला प्रारंभ होत असल्याने स्थानिकांना विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध होतील, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे.

Exit mobile version