| रसायनी | वार्ताहर |
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिनीनुसार पोसई लिंगप्पा सरगर, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, संदीप पाटील, यशवंत झेमसे, सुधीर मोरे, रवींद्र मुंडे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, अक्षय पाटील यांच्या पथकाने खालापूर तालुक्यातील कलोते चौक येथील बोहो फार्महाऊस केअर टिकर येथे छापा टाकून 5,53,300/- रु. किमतीचे ट्रांसफार्मरमधील तांब्याचे कॉइल व गुन्ह्यात वापरलेले व्हॅगनार कार व इतर साहित्य असा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त केला आहे. यावेळी आशिष अशोक यादव (25), शशिकांत सीताराम राजभर (32), विकी भानू गौतम (26)सर्व राहणार संजना स्क्रॅप, खेरणे एमआयडीसी, तुर्भे यांच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश म्हात्रे हे करीत आहेत.