पनवेलमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला

| पनवेल | वार्ताहर |

रिक्षेची चोरी

पनवेल शहरातील सिद्धार्थ मार्केट इमारतीत उभी केलेली रिक्षा पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून शहरातील मुख्य भागातून होत असलेल्या चोरीच्या प्रकरणामुळे वाहनमालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. शहरातील सिद्धार्थ मार्केट इमारतीत राहणारे सिद्धार्थ गोरेगावकर यांनी त्यांच्या मालकीची रिक्षा क्र एमएच 46 एझेड 8641 हि उभी ठेवली असता आज पहाटेच्या सुमारास सदर रिक्षाचे लॉक तोडून चोरून नेली आहे. याबाबतचे चित्रीकरण सिसिटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. याबाबत सिद्धार्थ गोरेगावकर यांनी चोरीची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

रेल्वेत बॅगची चोरी

रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोबाइलसह बॅग पळवून नेल्याची घटना पनवेल रेल्वे स्थानकात घडली आहे. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केरळमधील रहिवासी पैट्रिक विनसन्ट हे आपल्या भावाला भेटण्यासाठी पनवेलला कोच्चीवल्ली चंडीगड संपर्कक्रांती एक्स्प्रेसने येत असताना गाडीमध्ये चोरट्यांनी त्याच्याकडील एक आयफोनसह एकूण तीन फोन, रोख 5 हजार रूपये व इतर साहित्य अशी 2 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग पळवून नेली. याविषयी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाईलची चोरी

तळोजा येथील घोटगाव येथे सुरु असलेल्या इमारती बांधकामाच्या दुसर्‍या मजल्यावरील रुममध्ये ठेवलेले 4 मोबाईल फोन्स अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तळोजा येथील घोटगाव येथे बांधकाम सुरु असलेल्या अरिहंत अनायका बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावरील खिडक्या नसलेल्या रुममध्ये ठेवलेले सॅमसंगचे 2 काळ्या रंगाचे मोबाईल, विवो कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल, टेको शार्क कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल असे 4 मोबाईल फोन्स अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Exit mobile version