गोपाळ म्हात्रे राष्ट्रीय अवॉर्डने सन्मानित

| उरण । वार्ताहर ।

मुंबई चर्चगेट, आय.एम.सी येथे झालेल्या महाराष्ट्र लोक कल्याण सेवा संस्था व अमरदीप बाळ विकास फाऊंडेशन याच्या विद्यमाने आसनास हेल्थकेअर एज्युकेशन फाऊंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अनमोल रत्न अवॉर्डने अनेकांना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणार्‍यांना एकूण देशातून 80 जणांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उरण तालुक्यातील सारडे गावामधील गोपाळ दिनकर म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार देण्यासाठी पदमश्री डॉ रमाकांत देशपांडे, पदमश्री डाँ मुकेश बात्रा, कायवंत सावरकर, हौडो होंग राजदूत कोरिया, आणतोन पाषको, राजदूत बेलारुस, डॉ अमजद खान पठाण, एन. डी खान, सलमा खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version