| उरण | प्रतिनिधी |
अलिबाग येथे 26वी शितोरियू कराटे डो असोसिएशनची ऑल इंडिया ओपन चॅम्पियन कराटे स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये विविध वयोगटांमध्ये गोशीन रियु कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटात सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केली. यावेळी मनस्वी ठाकूर याने 2 सुवर्णपदक, स्वरा म्हात्रे हिने 1 सुवर्णपदक व 1 रौप्यपदक तर वेदा पाटील, श्रुजा गावं, साक्षी पाटील आणि अमिषा घरत यांनी कांस्यपटाकाची कमाई केली आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून 950 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सिहान राजू कोळी, गोपाळ म्हात्रे, परेश पावस्कर, अमिषा खरात, राकेश म्हात्रे, भूषण म्हात्रे यांनी केले. ही स्पर्धा सिहान राहुल तावडे व रागिनी तावडे यांनी भरविली होती.






