गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

। उरण । वार्ताहर ।
अलिबाग येथे पहिली कराटे डो ऑर्गनायजेशन जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. विविध वजनी गटामध्ये (काता व कुमिते प्रकारात ) मुले सहभागी झाली होती.
त्यामध्ये अभिज्ञा पाटील सुवर्ण पदक, नेत्रा गावंड सुवर्ण पदक, नेहा पाटील सुवर्ण पदक व कांस्य पदक, रितिका जोगदंड 2 कांस्य पदक, कक्षा म्हात्रे सुवर्ण पदक, समिक्षा पाटील २ सुवर्ण पदक, तमन्ना गावंड रौप्य पदक व कांस्य पदक, विनया पाटील सुवर्ण पदक व कांस्य पदक, मानसी ठाकूर सुवर्ण पदक, शुभम ठाकूर 2 सुवर्ण पदक, परेश पावस्कर रौप्य पदक व कांस्य पदक, रोहित घरत सुवर्ण पदक, अर्णव पाटील रौप्य पदक व कांस्य पदक, श्लोक ठाकूर कांस्य पदक व सुवर्ण पदक, अनिश पाटील सुवर्ण पदक, वैदेही घरत सुवर्ण पदक, योग म्हात्रे रौप्य पदक व कांस्य पदक, अमिषा घरत रौप्य पदक व कांस्य पदक, अमिता घरत सुवर्ण पदक व रौप्य पदक, अमर घरत सुवर्ण पदक व कांस्य पदक, अंश म्हात्रे रौप्य पदक, सुजित पाटील सुवर्ण पदक, सेजल पाटील सुवर्ण पदक व कांस्य पदक, करण पाटील रौप्य पदक व कांस्य पदक, स्पर्श ठाकूर रौप्य पदक, पूर्वा पाटील रौप्य पदक व कांस्य पदक ही पदके पटकाविली.

या मुलांची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या मुलांना गोपाळ म्हात्रे, राकेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये एकूण 250 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या स्पर्धेचे प्रेसिडेंट मातीवानंद राहुल तावडे , सचिव राजू कोळी, खजिनदार अतुल बोरा, उपाध्यक्ष अतुल पोतदार, सभासद संतोष मोकळ, राजेश कोळी, शुभम म्हात्रे, राजेश कोळी, कंकेश गावंड आदींनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version