तळा येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

239 लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ

। तळा । वार्ताहर ।

सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्‍न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेची सुरवात तालुक्यातील प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. योजनांचा लाभ मिळण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे सादर करुन जलद मंजुरी मिळणार आहे. या योजनेचाच भाग म्हणून तळा तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागामार्फत शहरातील द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयात तालुक्यातील नागरिकांसाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी संदीपान सानप, स्वाती पाटील, कुलदीप बोनगे, गणेश कराड, आनंद कांबळे, विराज लबडे, माधुरी घोलप, चंद्रकांत रोडे यांसह तालुक्यातील ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, महावितरण, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपंचायत व महसूल अशा एकूण नऊ विभागातील 239 लाभार्थ्यांनी विविध योजनेचा लाभ घेतला.

Exit mobile version