हुतात्मा वीर भाई कोतवाल टपाल तिकिटासाठी सरकारची मंजुरी

। माथेरान । वार्ताहर ।
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी 1942 च्या चलेजाव आंदोलनात अनेक क्रांतिवीरानी बलिदान दिलेले आहे. कर्जत तालुक्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल ,वीर हिराजी पाटील यांचा समावेश होतो. या हुतात्म्यांच्या माहितीची दखल केंद्र शासनाने घ्यावी म्हणून माथेरानचे नारायण सोनवणे यांनी आपल्या इतिहास संशोधनातून डाक विभाग नवी मुंबई यांच्या माध्यमातून केंद्र शासनास 2019 पासून सातत्याने पाठपुरावा करून माहिती सादर केली होती.
भारत सरकारने माहिती मंजूर करून हुतात्मा भाई कोतवाल यांची मायस्टॅप आणि विशेष टपाल पाकीट अनावरणास मंजुरी दि. 25 सप्टेंबरचे शासन आदेश क्रमांकाने महाराष्ट्र डाक परिमंडळ, ठाणे विभागास दिली आहे. 1 नोव्हेंबर रोजी श्रीनिवास व्यवहारे ,वरिष्ठ अधिक्षक डाकघर ठाणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविले आहे.ठाणे डाकघर विभाग कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास हुतात्मा भाई कोतवाल याचे वारसदार पवन कोतवाल, माथेरानचे श्रीप्रसाद रांजाणे, अमिता कुमार, मल्लिका बीश्‍वास ,अंकुश इंगळे, श्रीतेज घोडेकर, देवेंद्र कदम,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version