सहाणमध्ये ‌‘शासन आपल्या दारी’

शेकडो जणांनी घेतला शासकीय योजनेचा लाभ

| अलिबाग | प्रतिनिधी |

शासन आपल्या दारी उपक्रमातून सहाण ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थ, महिलांसाठी शासकीय योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाचशेहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला.

शेकाप अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच रेखा पाटील, उपसरपंच सौंदर्या पोईलकर, नरेश वर्तक, रेखा तुणतूणे, रत्नेश पाटील, सुनील पोईलकर, पांडुरंग मानकर, रणजित तुणतुणे, विजय तुणतुणे, अतिष तुणतुणे, सतीश तुणतुणे आदी पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शिधापत्रिका आधार लिंकसाठी होणारी ग्रामस्थांची धावपळ लक्षात घेता, सहाण ग्रामपंचायतीमार्फत सबसीडीसाठी आधार लिंक करण्याचा कार्यक्रम या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी घेण्यात आला. 190 लाभार्थ्यांच्या सबसीडीसाठी शिधापत्रिकेची आधार लिंक भारत व एचपी गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात आली. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ गावातील नागरिकांना मिळावा यासाठीदेखील कार्यक्रम घेण्यात आला. सहाण, सहाणगोठी, सहाण ठाकूरवाडी, सहाणगोठी आदिवासीवाडी येथील तीनशेहून अधिक नागरिकांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले.

Exit mobile version